Maharashtra Sanskruti Ghadan Ani Vikas | महाराष्ट्र संस्कृती घडण आणि विकास

Maharashtra Sanskruti Ghadan Ani Vikas | महाराष्ट्र संस्कृती घडण आणि विकास
महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास’ या ग्रंथात प्रारंभापासून इ. स. १८८५ पर्यंतच्या महाराष्ट्र संस्कृतीच्या घडणीचा सर्व अंगांनी विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्राची भूमी- तिचे भौगोलिक विशेष, महाराष्ट्राचा प्राक्कालीन व मध्ययुगीन इतिहास, मराठी लोकांचा वंश, मर्हाटी भाषेची प्रारंभीक घडण इत्यादींचा विचार करण्यात आला असून तो करताना अभ्यासकांच्या विविध मतांचा परामर्श घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी म्हणून यादवपूर्व राजवटींचा इतिहास देण्यात आला आहे. तसेच यादवकालीन महाराष्ट्राचे संपूर्ण चित्र रेखाटले आहे. बहामनीकालीन महाराष्ट्र, शिवकाल, पेशवाई आणि अव्वल इंग्रजी अंमल या कालखंडातील महाराष्ट्रीय जीवनाचे बदलते चित्र रंगवण्यात आले आहे. नाथ संप्रदाय व वारकरी पंथ आणि एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्या कार्याचा व शिकवणुकीचा उद्बोधक परामर्श घेण्यात आला आहे. ग्रंथाचा समारोप महाराष्ट्राच्या शिल्प, चित्र, नृत्य, नाट्य इत्यादि कला व क्रीडा आणि मराठी साहित्य यांच्या माहितीने होतो.