Maharshi Te Gauri | महर्षी ते गौरी

Maharshi Te Gauri | महर्षी ते गौरी
शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्र्वासानं स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे !संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल हे आपलं मत तर्कशुध्दपणे मांडताना समाजाशी एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे !आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गौरी देशपांडे! या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढया स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या.स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे.या पुस्तकात या तीन पिढयांचा लेखाजोखा घेतला आहे मंगला आठलेकर यांनी.