Mahasagar | महासागर

Mahasagar | महासागर
विवाहानंतर अल्पावधीत अपंग झालेल्या पतीचा निरतिशय जिव्हाळ्याने सांभाळ करून पुढे स्वत:चा प्रपंच मोठ्या मायेने चालवणार्या एका सतीची कहाणी येथे विस्ताराने चितारली आहे. येथे पार्श्वभूमीदाखल कोकण आहे. पती-पत्नींचे विवाहोत्तर नाते ... पतीच्या विकलांगतेने येणारे ताण ... पतीची शारीर-ओढ आणि तितकीच सच्ची भावकोमलता ... पत्नीचा कौतुकास्पद संयम तिची सर्वस्पर्शी सहृदयता तर उभयतांच्या या नात्यातले गहिरे पदर आणि सहकुटुंबीयांबरोबरचे तणाव यांनी महासागराला आकार प्राप्त झाला आहे.श्री आणि उषा यांच्यातील भावजीवनाचे हळुवार दर्शन घडवीत असतानाच कोकणातील कुटुंबांतील ताणे-बाणे, अंतर्गत कलह यांचे प्रखर दर्शन या कादंबरीतून घडते.