Mahasattechya Watewar | महासत्तेच्या वाटेवर

Mahasattechya Watewar | महासत्तेच्या वाटेवर
माहितीपर आणि प्रबोधनात्मक अशा १० लेखांचा संग्रह असलेले हे युवराज कोरे लिखित पुस्तक म्हणजे जनजागृतीचा एक वेगळा प्रयत्न आहे. रेशनकार्ड, शेतजमिन, पर्यावरणीय समस्या या संदर्भातील सर्वसामान्य जनतेला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या त्या विषयावर लिहिलेल्या लेखातून लेखकाने दिली आहेत. तरुणांनी जरूर पाहावेत अशा चित्रपटांची सविस्तर यादीही त्यांनी एका प्रकरणात दिली आहे. अनेक कागदपत्रांचे आणि अर्जांचे नमुनेही त्यांनी या पुस्तकात समाविष्ट केले आहे.आजच्या घडीला देशासमोर असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतचे विचारमंथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. सदर पुस्तकामध्ये पुरंदर किल्ल्याचे मनोगतही त्यांनी लिहिले आहे.