Majestic Kothawale | मॅजेस्टिक कोठावळे
Majestic Kothawale | मॅजेस्टिक कोठावळे
अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांचे जिव्हाळ्याचे मित्र, प्रकाशक-पुस्तकविक्रेत्यांचे आधारस्तंभ, चोखंदळ आणि बहुश्रुत वाचक, ग्रंथप्रदर्शने-मॅजेस्टिक गप्पा आदी उपक्रमांचे प्रेरणास्थान, `ललित आणि `दीपावली या नियतकालिकांचे कुशल संपादक अशा बहुविध कामांमुळे वाङ्मयीन संस्कृतीत भर घालणारे केशवराव कोठावळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मान्यवर लेखकांनी घडविलेले बहुमिती दर्शन.केशवराव कोठावळे यांच्या बहुआयामी कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या आयुष्यातील स्थित्यंतरांचा आणि स्वभावविशेषांचा शोध घेताना एका यशस्वी प्रकाशकाची आणि अस्सल माणसाची प्रतिमा या पुस्तकामध्ये साकारत जाते.