Majhi Aai | माझी आई

Majhi Aai | माझी आई
या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे. डॉ.जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, व्यंगचित्रकार श्री. शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणक्षेत्रातील श्री. रमेश पानसे,मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या िवषयावर अतिशय हृद्य असे लेख लिहिले आहेत.पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ, त्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदान, तिचे आणि त्यांचे नाते, यांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेल. थोडक्यात, माझी आई हे पुस्तक मदर्स डे च्या निमित्ताने अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल.