Manasamazavan | मनसमझावन

Sangram Gaikwad | संग्राम गायकवाड
Regular price Rs. 338.00
Sale price Rs. 338.00 Regular price Rs. 375.00
Unit price
Manasamazavan ( मनसमझावन ) by Sangram Gaikwad ( संग्राम गायकवाड )

Manasamazavan | मनसमझावन

About The Book
Book Details
Book Reviews

या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात. "एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’ ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक उदार सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.- डॉ. नीतीन रिंढे"

ISBN: 978-9-39-237491-3
Author Name: Sangram Gaikwad | संग्राम गायकवाड
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 255
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products