Manashakti Vadhava | मनःशक्ती वाढवा

Manashakti Vadhava | मनःशक्ती वाढवा
आपल्या मनाचा ताबा घ्या. आपलं आयुष्य आपल्या ताब्यात ठेवा. सर्वोत्कृष्ट लेखक आणि जीवनशिक्षक असणाऱ्या गौर गोपाल दास यांनी या पुस्तकात मनाचं कार्य उलगडून दाखवलं आहे. लहान-मोठे किस्से सांगत पुढे जाण्याची त्यांची खास शैली इथे पुन्हा दिसून येते. मनाला समजून कसं घ्यायचं आणि आपल्या भल्याकरता त्याला शिस्त कशी लावायची हे ते समजवतात. संपूर्ण पुस्तकात ते अनेक सक्रिय कृती आराखडे आणि ध्यानधारणेची तंत्रं सांगतात, वर्कशीट्स देतात जेणेकरून आपल्या विचार-कृतीवर ताबा ठेवण्याच्या दृष्टीने स्वतःत बदल घडवून आणण्यात आपल्याला मदत होईल. अधिक चांगल्या आणि अधिक समाधान देणाऱ्या परिपूर्ण अशा भविष्याकडे वाटचाल करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक.