Manashanti | मनःशांती

Ahmat Hamdi Tanpinar | अहमत हमदी तानपिनार
Regular price Rs. 495.00
Sale price Rs. 495.00 Regular price Rs. 550.00
Unit price
Manashanti ( मनःशांती ) by Ahmat Hamdi Tanpinar ( अहमत हमदी तानपिनार )

Manashanti | मनःशांती

About The Book
Book Details
Book Reviews

मन:शांती या कादंबरीचा काळ दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा. १९२० साली ओटोमन सत्तेची फाळणी झाल्यावर नवे सरकार स्थापन झाले. १९२० ते १९३० ह्या काळात तुर्कस्तानला आपली ओटोमन-मुस्लिम जुनी संस्कृती विसरून पाश्चात्त्य संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागले, जुन्या तुर्की लिपीचा त्याग करून नवीन लॅटिन तुर्की भाषेचा स्वीकार करावा लागला. ह्या सगळ्या परिवर्तनातून जाणाऱ्या एका समाजातील मुमताझ ह्या तरुणाची आणि त्याच्या जीवनात आलेल्या माणसांची ही कहाणी आहे. "अहमत हमदी तानपिनार हे ह्या कादंबरीचे लेखक स्वत: इस्तंबूल विद्यापीठात तुर्की वाङ्मयाचे प्राध्यापक होते. तुर्की शास्त्रीय संगीत इतिहास तत्त्वज्ञान ह्या सर्वच गोष्टींचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. नायक मुमताझ ह्याच्या तोंडून बरेचदा ते स्वतःच बोलत आहेत असे वाटते.बॉस्फरसच्या सामुद्रधनीचे तेथील फेरीबोटीच्या प्रवासाचे आणि त्या फेरीतून होणाऱ्या नायकनायिकेच्या नयनरम्य भेटीगाठींचे वर्णन वाचून आपल्यालाही त्या प्रवासाला जावेसे वाटू लागते. इस्तंबूलचा बंदिस्त बाजार जवळ जवळ चारशेहून अधिक वर्षे जुना आहे. परिस्थिती खालावल्यामुळे मोठमोठ्या उमरावांकडून तिथे जुन्या संस्कृतीला बाजारात विकायला काढल्यामुळे नायकाला वाटणारी विषण्णता आपल्याही काळजात खिन्नता आणते. शेवटी जुन्या संस्कृतीचा विनाश ही सार्वकालिक घटना आहे. ती जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकते घडत असते म्हणूनच ही कांदबरी कुठल्याही भाषेतील वाचकाला जवळची वाटेल."

ISBN: 978-8-17-185492-9
Author Name: Ahmat Hamdi Tanpinar | अहमत हमदी तानपिनार
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: Savita Damale ( सविता दामले )
Binding: Paperback
Pages: 510
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products