Mandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी

Mandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी
लोकसत्ताचे सहायक संपादक अरविंद व्यं. गोखले यांनी लो. टिळक आणि त्यांना राजद्रोही ठरविणारे इंग्रज सरकार यांच्यातील संघर्षाची कहाणी मांडली आहे. लोकमान्य टिळकांना नामोहरम करण्यासाठी ब्रिटिश राजकर्त्यांनी जंग जंग पछाडले. त्यांच्या लेखनाकडे वक्रदृष्टी वळवून राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांच्यावर खटले भरण्यापर्यंत त्या साम्राज्यवाद्यांची मजल गेली. त्या संघर्षात लोकमान्यांचे वकिली कौशल्य पणाला लागले आणि तरीही त्यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांना दूर ब्रह्मदेशात मंडाले येथे डांबण्यात आले. या सार्या दुष्टचक्राला ते धीरोदात्तपणे सामोरे गेले. गीतारहस्य हा ग्रंथ लिहूनही त्यांनी इतिहास घडवला. त्या प्रेरणादायी संघर्षगाथेचे प्रभावी चित्रण करणारे साधार पुस्तक. लोकमान्यांच्या हस्ताक्षरातील त्यांच्या संपूर्ण मृत्युपत्राचा परिशिष्टात समावेश केल्यामुळे अत्यंत संग्राह्य.