Manmokale : Tanavmukt Jaganyasathi Sahajsopya Tips | मनमोकळं : तणावमुक्त जगण्यासाठी सहजसोप्या टिप्स

Manmokale : Tanavmukt Jaganyasathi Sahajsopya Tips | मनमोकळं : तणावमुक्त जगण्यासाठी सहजसोप्या टिप्स
रोजच्या जगण्यात ,आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. कळत- नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. मनात अनेक प्रश्न येत असतात. माझ्याच बाबतीत असं का होतं? काय हवं आहे नेमकं मला आयुष्यात ?जगण्याच्या रोजच्या धबडग्यातून कसं मिळवायचं ते ?एवढा राग कसला येतो मला ?नेमकं काय म्हणायचं याला ?... भीती ?अतिविचार ?की अस्वस्थता ?ही माणसं नीट का वागत नाहीत माझ्याशी ?नेमकं काय वाढून ठेवलं आहे आयुष्यात पुढे ?आजूबाजूचे लोकं समजावतात ,'सोडून दे 'किंवा 'तू लक्ष देऊ नको ' पण खरंच असं 'सोडून देता 'येतं का?वरवर दुर्लक्ष केलं तरी खटकणाऱ्या गोष्टी नाहीशा होत नाहीत. अशा खटकणाऱ्या गोष्टींतून मार्ग काढण्यासाठी हवा असतो तो 'मनमोकळा' संवाद ! मनातलं सांगितल्यावर कोण काय म्हणेल,माणसं तुटतील का ;अशी कोणतीही भीती नसलेला संवाद !! असा संवाद स्वतःशी आणि इतरांशी साधण्याचे विविध मार्ग दाखवणारं पुस्तक....