Marathi Cine Saptarshi |मराठी सिने सप्तर्षी

Marathi Cine Saptarshi |मराठी सिने सप्तर्षी
बाबूराव पेंटर, बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, आचार्य अत्रे, व्ही. शांताराम, मास्टर विनायक, राजा परांजपे या सप्तर्षींनी मराठी चित्रपटांना वेगळीच उंची मिळवून दिली. मराठी चित्रपटांची चर्चा केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली, यामागे शांताराम, पेंढारकर प्रभुतींचे प्रयत्न होते, कला होती, धडपड होती. शशिकांत श्रीखंडे यांनी मराठी सिनेसप्तर्षी या ग्रंथाद्वारे या थोर चित्रतपस्वींना मानाचा मुजरा केला आहे. हे पुस्तक केवळ रुक्ष तपशील नाही, या नावांशी जोडला गेलेला रंजक आणि रोमांचकारी इतिहास श्रीखंडे यांनी आपल्या लेखणीतून जिवंत केला आहे. जुन्या पिढीतील या तपस्वींनी घातलेला पाया किती भक्कम होता आणि तो किती महत्त्वाचा ठरला, याचे दर्शन श्रीखंडे यांनी नेमकेपणाने घडविले आहे