Marathi Katha : 1940 - 2000 Ek Paramarsh | मराठी कथा : १९४० - २००० एक परामर्श

Marathi Katha : 1940 - 2000 Ek Paramarsh | मराठी कथा : १९४० - २००० एक परामर्श
मराठी कथा हा सुधा जोशी यांच्या आस्वादाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे.विसाव्या शतकातील मराठी कथेचा १९४० ते २००० हा कालखंड, विशेषत: त्यातल्या नवकथेचा आणि १९६० नंतरच्या तिच्या बहुलक्ष्यी विस्ताराचा कालपट या पुस्तकात आलेला आहे.नवतेचा अग्रदूत असलेल्या नवकवितेने आणि नवकथेने मराठी साहित्याला एक वेगळे वळण दिले. त्याचे दूरगामी परिणाम एकूणच मूल्यव्यवस्थेवर आणि संस्कृतिविचारावर झाले.सुधा जोशी ह्यांनी अंतर्लक्ष्यी आणि बहीर्लक्ष्यी प्रवृत्तींमध्ये आंदोलित होत राहिलेला कथेचा हा प्रवास त्यातील कलात्मक वैशिष्टये आणि तिला असलेले सामाजिक संदर्भ यांच्यासह सांगितला आहे. तो अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना आधुनिकोत्तर साहित्याच्या संदर्भातही उद्बोधक ठरेल.