Marathi Natakavaril Ingraji Prabhav : A Case Study |मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव : तौलनिक नमुना चिकित्सा

Marathi Natakavaril Ingraji Prabhav : A Case Study |मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव : तौलनिक नमुना चिकित्सा
मराठीतील कथा - कादंबरीकार, मान्यताप्राप्त शेक्सपिअर स्कॉलर व इंग्रजी तौलनिक साहित्याचे प्राध्यापक म्हणून डॉ. आनंद पाटील प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश कालखंडातील मराठी नाटकावरील प्रभावाचा शोध त्यांनी शास्त्रशुद्ध नमुना चिकित्सापद्धती वापरून घेतला असून अचूक रोगनिदान केले आहे. "हे करताना भारतीय संदर्भात प्रभावसंकल्पना वापरताना घ्यावयाची दक्षता पाश्चात्य पद्धतीच्या मर्यादा व कलाकृतीची मूलभूतता मोजण्याच्या कसोट्या सप्रमाण मांडल्या आहेत. नाट्यकुलवृक्षाचा आडवा छेद घेऊन प्रभावप्रक्रियेत टिकलेल्या मराठीपणाचा वेध रेखाचित्रे तक्ते. आकडेवारी वैगरे देऊन दर्शविला " "आहे. मराठीत प्रातिनिधिक 'राष्ट्रीय ' मराठी नाटक नाही इंग्रजी नाटकाचा 'प्रभाव नसून अनुकरण वाड्मय चौर्य गर्भपतित - अर्धेकच्चे प्रभाव इ. प्रकारचे नमुनेच आहेत.इ. निष्कर्ष धक्कादायक आहेत. ते आपुले वाङ्मयीन ' स्वरूप ' जाणण्यास उपयोगी आहेत. मराठीत वाङ्मयीन प्रभावाभ्यासाचा पाया घालणारा हा पहिलाच तौलनिक ग्रंथ आहे."