Mardhekaranchi Kavita Swarup Ani Sandarbh : Khand Dusara | मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ : खंड दुसरा

Mardhekaranchi Kavita Swarup Ani Sandarbh : Khand Dusara | मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ : खंड दुसरा
'मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ' हा डॉ. विजया राज्याध्यक्ष यांचा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे मर्ढेकरांच्या कवितेचा संशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास होय. या पहिल्या खंडात, सुरूवातीला मर्ढेकरांच्या कवितेवरील समीक्षेचे संक्षिप्त समालोचन व एकूण नवकाव्याविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतर मर्ढेकरांच्या कवितेतील आशयसूत्रे आणि मर्ढेकरांची काव्यशैली व प्रतिमासृष्टी यांच्या विवचनातून मर्ढेकरांच्या कवितेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे. तसेच मर्ढेकरांच्या कवितेवरील आक्षेप, तिचा समकालीन व पुढील कवींवर पडलेला प्रभाव, मर्ढेकरांची परंपरा आणि मर्ढेकरांच्या कवितेचे सामर्थ्य व मर्यादा यांचाही सखोल विचार मांडलेला आहे.