Marilyn Monroe | मॅरिलीन मन्रो

Marilyn Monroe | मॅरिलीन मन्रो
कुणी तिला 'शापित अप्सरा' म्हणो, कुणी 'लिव्हिंग लिजंड'. मेरिलिन मन्रो ही हॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय सिनेतारका, यात दुमत असण्याचे कारण नाही. तिच्या हयातीत 'डंब सेक्सी ब्लॉंड' असे हॉलिवूडने तिचे वर्णन केले. नेमक्या याच शब्दांनी आयुष्यभर तिचा पिच्छा सोडला नाही. ही प्रतिमा मोडून, नवे काहीतरी करण्याची जबरदस्त इच्छा असूनही मेरिलीन पुन्हा-पुन्हा त्यातच गुंतत गेली. कोटयवधी चाहत्यांना मेरिलीनने घायाळ केले..अजूनही करत आहे. मात्र चित्रपटांत दिसणार्या मेरिलिनच्या व्यक्तिरेखेमागे जाऊन ती प्रत्यक्षात कशी होती याचा घेतलेला शोध म्हणजेच यांनी मीना देशपांडे यांची 'मर्लिन मन्रो' ही कादंबरी.काहीशी संथ सुरवात आणि पात्रांची भाऊगर्दी यातून हळूहळू मेरिलीनची जीवनकथा उलगडते. तिची महत्त्वाकांक्षा, हेकेखोरपणा आणि लहरीपणा, तिचे एकाकीपण आणि असह्यता, हॉलिवूडने केलेले शोषण आणि अवघ्या छत्तीसाव्या वर्षी झालेला तिचा गूढ मृत्यू ..मन्रोचा हा जीवनपट कादंबरीतून यथार्थपणे चित्रित होतो.