Mark Zuckerberg | मार्क झुकरबर्ग

Mark Zuckerberg | मार्क झुकरबर्ग
आज फेसबुकविषयी काहीच माहीत नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्य आहे. प्रत्येक जण थोड्या थोड्या अवधीनंतर या निळ्या आयकॉनवर क्लिक करून आभासी जगात प्रवेश करत असतो आणि आपलं मानसिक समाधान करून घेत असतो. या भव्यदिव्य आणि सर्वदूर पसरलेल्या, आपलं जग व्यापून टाकणार्या आणि त्याशिवाय आता राहणंच शक्य नाही अशा फेसबुकची ज्याने निर्मिती केली त्या अवलियाचा जीवनप्रवास जाणून घेणंही तितकच रोमांचकारी आहे. कारण त्याचा हा प्रवास अदभुत तर आहेत आणि आपल्याला बरचं काही शिकवणारा आहे. प्रचंड बुद्धिमानी, सॉफ्टवेअरचा किंग, उत्कृष्ट लीडर, दानशूर व्यक्ती... असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मार्क झुकरबर्ग.