Mastani Ek Navin Drushtikon | मस्तानी: एक दृष्टिकोन

Mastani Ek Navin Drushtikon | मस्तानी: एक दृष्टिकोन
बाजीराव मस्तानीच्या संबंधाची, निःस्वार्थ प्रेमाची, त्यागाची अमरकहाणी या ग्रंथरूपाने मांडलेली आहे. "मस्तानी-बाजीराव यांची जीवनकहाणीच अनोखी आणि अद्वितीय आहे. केवळ १० वर्षांच्या सहवासातून या दोघांनी एवढे नाव कमावले की आजही त्यांना कोणी विसरत नाही." या ग्रंथात वेगळ्या दृष्टिकोनातून मस्तानी आणि बाजीराव यांचा इतिहास मांडलेला आहे. मस्तानीवर जो अन्याय त्यावेळी झाला त्याला नेमके कोण कारणीभूत होते? हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मध्ययुगात असा प्रयत्न झाला नव्हता. परंतु सकारात्मक लिखाणातून मस्तानीवर झालेले अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. असाच प्रयत्न या ग्रंथात झालेला आहे.