Matters of the Heart | मॅटर्स ऑफ द हार्ट

Matters of the Heart | मॅटर्स ऑफ द हार्ट
होप डन या जागतिक ख्यातीच्या व्यावसायिक फोटोग्राफरच्या सुंदर,अर्थपूर्ण आणि कलात्मक फोटोग्राफीची प्रदर्शनं लावण्यासाठी अमेरिकेत आणि बाहेरच्या जगात चढाओढ चाललेली...ती दिसायलाही नाजूक,ओट्या,वेड लावणाऱ्या कवितेसारखी,त्यातही तिच्या जीवन कहाणीला काळी किनार...तिच्या प्रख्यात डॉक्टर नवऱ्यानं त्याच्या सततच्या गंभीर आजारामुळे तिला डिव्होर्स दिलेला...होपच्या दु:खात आणखी भर असते त्याआधीच झालेल्या तिच्या एकुलत्या एका मुलीच्या निधनाची..होप अशा दु:खाच्या सावटात एखाद्या विरक्त जोगीणीसारखी राहात असतानाच ओनील फिन या नामवंत लेखाकाच्या रुपानं तिला पुन्हा सोनेरी भविष्यकाळ साद घालायला लागतो...त्याचा भूतकाळ वादळ होऊनतिला घेरून टाकतो....भूतकाळातल्या अंधकारात दडलेली रहस्यं आणि सत्य...तिच्यासमोर अचानक आलेल्या या प्रेम आणी सत्य यादोहोंमधल्या द्वंद्वात सापडलेला अदभूत वळणावरचा प्रवास म्हणजेच `मॅटर्स ऒफ द हार्ट,...हॄदयातून उफाळून येणाऱ्या प्रेमाची एक जगावेगळी कहाणी....