Mawalcha Kanha | मावळचा कान्हा

Mawalcha Kanha | मावळचा कान्हा
हा 'मावळचा कान्हा' म्हणजे मावळखोऱ्यातला हा कान्होजी जेथेही "श्रीकृष्णाप्रमाणे तो दैवी सामर्थ्याचा व अलौकिक कर्तृत्वाचा असा नव्हता हे खरे पण तो शहाजी शिवाजीराजे भोसले यांच्या काळातला एक सत्प्रवृत्त शूरवीर होता. कृष्णासारखीच याच्यावरही जन्मापासूनच संकटे कोसळली जन्मदात्याच्या सहवासाला अंतरावे लागले. पण ईश्वरकृपेने ती संकटे दूर झाली व एक कर्तबगार जीवन उदयास आले. तोच हा 'मावळचा कान्हा' कान्होजी जेधे कारीचे देशमुख !" यांना सुदैवाने दोन सुवर्णसंधी प्राप्त झाल्या. एक शहाजीराजे भोसले यांचा सहवास अनेक वर्षे लाभला व नंतर शिवाजीमहाराजांचे सेवेतही श्रेष्ठ व प्रमुख सरदार या नात्याने युद्धात थोर कामगिरी करता आली.