Maza Bharat | माझा भारत

Maza Bharat | माझा भारत
मूळचे शिकारी असलेल्या द्रष्ट्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवले की, जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणार्या १९ नरभक्षक वाघ आणि १४ नरभक्षक बिबट्यांची शिकार जिम कॉर्बेट यांनी केली. नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती व निरीक्षणे जिमने पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या. नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.