Maza Mazyapashi ? | माझं माझ्यापाशी ?

Maza Mazyapashi ? | माझं माझ्यापाशी ?
व. पु. काळे एक वाचकप्रिय लेखक. त्यांच्या लेखनात वाचकांशी हितगुज करण्याची, बोलण्याची एक उर्मी आहे. ती उर्मीच वाचकांना खेचून घेते. वपुंच्या कथा या प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात घडणार्या कथा आहेत. या कथांच्या अनुषंगाने वपु जे भाष्य करतात ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक कथेतून चिंतन करणारं, जीवनावर भाष्य करणारं एक जागतं मन वाचकांना भेटत असतं. छोट्या छोट्या प्रसंगातून वाचकाला विचारप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य या कथांमध्ये आहे. या कथासंग्रहात एकूण चौदा कथा आहेत. ही प्रत्येक कथा मानवी मनाच्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. माणसाच्या घुसमटलेल्या विचाराचे तरंग या कथातून व्यक्त होतात. रसिक वाचकांना मेजवानी ठरावी अशा चिंतनशील कथा.