Maze Sangit | माझे संगीत

Maze Sangit | माझे संगीत
मराठी - आणि भारतीय - चित्रपटसृष्टीमध्ये केवळ लोकप्रिय नव्हे तर उच्च दर्जाच्या काही थोड्या संगीत-दिग्दर्शकांमध्ये केशवराव भोळे यांची गणना होते. अमृतमंथन,तुकाराम,कुंकू,माझा मुलगा,ज्ञानेश्वर, इत्यादि चित्रपट आणि आंधळ्याची शाळासारखीं नाटकें यांमधल्या त्यांनी दिलेल्या चाली तर लोकप्रिय झाल्याच; परंतु चोखंदळ रसिकाला विशेष जाणवली, ती त्यांमागची साक्षेपी कलादृष्टि. डॉक्टरीचा अभ्यास सोडून संगीतसाधनेकडे वळलेल्या केशवरावांच्या निर्मितिक्षम प्रतिभेले विश्लेषक दृष्टीची आणि सुभग भाषाशैलीचीहि जोड मिळाली आहे. आणि अमूर्त कलातत्त्वांबरोबर माणसें, प्रसंग, वातावरण, कला-निर्मितीमागची धडपड व तिच्या यशापयशांतील नाट्य यांमध्येहि त्यांना रस आहे. चित्रपटासारख्या आधुनिक, तंत्रप्रधान, समूहनिष्ठ कलेच्या श्राव्य अंगाविषयी मराठी भाषेंत अशा तऱ्हेच्या हा पहिलाच ग्रंथ आहे, असें म्हणावयास हरकत नाही.