Mazi Biradari | माझी बिरादरी
Mazi Biradari | माझी बिरादरी
क्रांती शाह ही एक व्यक्ती नाही. तो एक भला मोठा कॅनव्हास आहे, ज्यावर देशातील अनेक कला-साहित्य-संस्कृती-संगीताचे चित्तवेधी रंग आहेत. त्या भल्या मोठ्या कॅनव्हासकडे पाहून एकच नव्हे तर अनेक भावना, विचार, संस्कार आपल्या अंतर्मनावर उमटू लागतात. स्टुडंट्स कौन्सिलमार्फत दुष्काळ, भूकंप या काळातले मदतकार्य, वनसंवर्धन, स्त्रीभ्रूणहत्या, वसुंधरा बचाव असे विषय घेऊन केलेल्या यात्रा, दांडी स्मृतियात्रा, जोडो भारत, एक सूर एक ताल, नदी संरक्षण, युवोत्सव ते युवक बिरादरी असे सतत नवीन उपक्रम करून क्रांती यांनी सांस्कृतिक अंगाने सामाजिक घुसळण केली. चळवळींमध्ये तरुण पडतात पण काही काळानंतर ते निराशेच्या गर्तेत कोसळतात वा वैतागून चळवळ वा संस्था सोडून देतात. क्रांतींचे सर्वात मोठे कर्तृत्व माझ्या मते हेच आहे, की ते कधीही निराशावादाच्या वा महत्त्वाकांक्षेच्या, पर- प्रतिष्ठेच्या वा पैशांच्या सापळ्यात सापडले नाहीत आणि 'एकला चलो रे'ला खूप मोठे सामाजिक-सांस्कृतिक सामर्थ्य मिळवून दिले. हे त्या अथक प्रवासाचे प्रेरणादायी अनुभव-चिंतन आहे. -- कुमार केतकर