Mazi Katemundharichi Shala | माझी काटेमुंढरीची शाळा

Mazi Katemundharichi Shala | माझी काटेमुंढरीची शाळा
बाबुजी काहेको मरने काटेमुंढरी जाते हो, असा सल्ला जातानाच मिळूनही, ज्या गावात शिक्षकाचा खून होतो, त्याच गावात एक शिक्षक गडद अंधा-या रात्री प्रवेश करतो. पंचवीस वर्षे त्याच अंधारात चाचपडत, ठेचकाळत शिक्षणाची नवी पहाट गावाला दाखवतो. उजाडतं तेव्हा त्याच शाळेत शिकलेला विदयार्थी त्याच शाळेचा मुख्याध्यापक होउन राष्ट्र्पती पदक विजेता झालेला एखादया चित्रपटासारखे खिळवून ठेवणारे हे कथानक. एकाचवेळी शिक्षणाचे प्रश्न आणि आदिवासींची संस्कृती, पाठयपुस्तकात आणि चार भिंतीत न मावणारी आदिवासी मुलांची जिज्ञासा, खळाळणा-या पाण्यासारखं आदिवासींचं निरागस जगणं, हे सार पानापानावर भेटत राहतं.