Mazya Durgabai | माझ्या दुर्गाबाई
Mazya Durgabai | माझ्या दुर्गाबाई
माणूस स्वत:शी सुसंगत नाही झाला तर तो कुणाशीही सुसंगत होत नाही.” बाई स्वतःशी सुसंगत होत्या, तिथूनच त्यांना उर्जा मिळाली असावी. बाई एकदा मला म्हणाल्या होत्या “मला जगण्यात सुख वाटतं बघ." यामागचं कारण याबद्दल मला वाटतं बाईंना जगाबद्दल, जगण्याबद्दल प्रचंड ओढ, कुतुहल होते. ऐन तारुण्यात ओढवलेल्या जीवावरच्या दुखण्यातून आश्चर्यकारक रीतीने त्या बऱ्या झाल्या होत्या. तेव्हा उजाडलेला प्रत्येक दिवस म्हणजे त्यांना इश्वराने दिलेली देणगी वाटला होता. प्रत्येक दिवस त्या उत्साहाने जगल्या. साडीचे काठ असोत, अचानकच आभाळात दिसणारा चंद्र त्याचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाची सावली असो की कुंडीतल्या मरू घातलेल्या रोपाला फुटलेलं कोवळं, नवं चिमुकलं पान असो, सगळ्याचा आनंद त्या साजरा करीत. तसेच कोणाचे वागणे बोलणे त्यांना पटले नाही तर त्या त्यांचाही खरपूस समाचार घेत.