Melelya Lekhkanchya Chaukashiche Prakaran : Ek Fiction | मेलेल्या लेखकांच्या चौकशीचे प्रकरण : एक फिक्शन

Melelya Lekhkanchya Chaukashiche Prakaran : Ek Fiction | मेलेल्या लेखकांच्या चौकशीचे प्रकरण : एक फिक्शन
जे लोक आज पुस्तके जाळतात ते एक दिवस माणसे जाळू लागतील. ‘Those who burn books today will eventually burn people’ – Heinrich Heine "मानवी इतिहासात अनेक तत्त्वचिंतकांनी आणि तत्त्वप्रणालींनीं ‘मी’ ‘स्व’ किंवा मानव एजन्सी असणे याबद्दल महत्त्वाची मांडणी केलेली आहे. अर्थातच त्यांच्या एकंदर तत्त्वविचारातील तो एक घटक होता. असा घटक ज्याचा विचार सामाजिक-राजकीय वास्तव ते मानवी अस्तित्वाविषयक प्रश्न ते नैतिक मूल्यव्यवस्था ते भावनिक प्रेरणाविश्व अशा व्यापक अवकाशावर पसरलेला होता. काही विचारवंतांचे ‘मी कोण’बद्दलचे असे काही विचार एकत्र गुंफावेत पण ते माझ्या दृष्टिकोनातून; अशाप्रकारे की त्याला माझी म्हणून काही चौकट असावी समकालीन राजकीय संदर्भ असावेत असा हेतू या साहित्यकृतीमागे आहे. असा प्रयत्न करणारं हे एक फिक्शन आहे एक कल्पित आहे थोडेसे ललितही आहे." "या लिखाणाला कादंबरी म्हणता येईल किंवा नाही हे मला ठाऊक नाही तसे पाहिल्यास आजमितीस अनेक गोष्टींच्या व्याख्याच बदलत आहेत." "एक धोक्याची सूचना इथेच द्यावी म्हणतो. हा प्रश्न सोपा नाही या कोड्याला एक उत्तरही नाही. पण या कोड्याशी झुंजताना मला मोठेच समाधान मिळाले. ही जोखीम उचलली तर कदाचित वाचकांपैकी काहींनाही तसाच आनंद मिळेल म्हणून हे पुस्तक आपापल्या जबाबदारीवर वाचण्याचे करावे!"