Mhai | म्हाई

Mhai | म्हाई
‘मस्त कलंदर’ ही कथा आहे दोन प्रेमी जीवांची. या कथेतील ‘ती’ गरीब बिचारी. आधी हॉटेलात भाकर्या बडवणारी. मग तंबाखूच्या मळ्यात राबणारी. तिला भेटतो ‘तो’. तिच्याशी लग्न करू इच्छितो; पण तिच्या घरून होतो विरोध... ‘बळी’ कथेत म्हसोबाच्या नवसासाठी दिले जात कोंबड्यांचे बळी; पण एके दिवशी तिथे अचानक दिला गेला नरबळी एका वकिलाचा...‘गलत है लूट लिया’ कथेत, कविता आणि गाणी लिहिणारा तो भेटला लेखकाला; त्याला पुस्तक काढण्यासाठी पैसेही दिले लेखकाने; पण तो अचानक गायब झाला आणि त्याचं गाणं लेखकाला ऐकायला मिळालं पाकिस्तानच्या रेडिओ केंद्रावरून...‘फडा’ कथेतील श्यारीवर दिवाणजीची कामुक नजर खिळते आणि त्याच्या वासनेचा फडा तिला असहाय्य करतो...म्हाईची धामधूम, चुलीवर चढलेले हंडे, गावात आलेले पाहुणे, जेवणावळी, तमाशाची तयारी असं म्हाईचं साग्रसंगीत वर्णन येतं ‘म्हाई’ या कथेत...ग्रामीण जीवन...तिथल्या समजुती...तेथील दारिद्र्य...तेथील स्त्रीची अगतिकता...तेथील लोकांची सुख-दु:खं यांचं महादेव मोरे यांच्या लेखणीतून उतरलेलं सजीव चित्रण.