Mi Ashwathama Chiranjiv | मी अश्वत्थामा चिरंजीव

Mi Ashwathama Chiranjiv | मी अश्वत्थामा चिरंजीव
प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता श्री. अशोक समेळ यांनी 'मी अश्वत्थामा...चिरंजीव' ही महाकादंबरी लिहिली आहे. श्रीमहर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली मराठीतील बहुतेक पहिली कादंबरी असावी. अनेक संदर्भग्रंथांचे मंथन करून अनेक दोषारोपांत बुडालेल्या अश्वत्थामा या व्यक्तिरेखेला योग्य न्याय मिळवून दिला आहे. कलाधिष्ठित स्वातंत्र घेऊन लेखक अशोक समेळ यांनी अश्वत्थामाच्या आत्मसंवादातून त्याचा मानसिक प्रवास नितांतसुंदर शब्दबंधातून साकार केला आहे. अश्वत्थामाच्या आंतरिक सृष्टीचे मर्मभेदी व यथार्थ चित्रण केले आहे. "वेदशास्त्रसंपन्न असलेल्या या पापभीरू द्विजाने महासंहाराच्या शेवटच्या पर्वात शास्त सोडून शस्त्र हातात का घेतले? या सार्वभौम नैतिक प्रश्नाची समर्पक उकल करण्यात कादंबरीकार कमालीचे यशस्वी झाले आहेत. तसेच कलियुगकर्त्या अश्वत्थामाच्या व कहाणीच्या अनुषंगाने भूतकाळाचा सांधा वर्तमानकाळाशी सहजपणे जोडण्यात या कादंबरीचे सार्थ यश दिसते. अर्थगर्भ आशयाने सत्य शिव सुंदर या भारतीय संस्कृतीच्या मूल्यत्रयींची पुनर्स्थापना करणारी ही महाकादंबरी अशोक समेळ यांनी मराठी रसिकतेला बहाल केली आहे."