Mi Bahurupi | मी बहुरूपी

Mi Bahurupi | मी बहुरूपी
या आठवणी आहेत. आठवणी माझ्या आजवरच्या प्रवासातल्या. नट म्हणून आलेल्या बऱ्यावाईट अनुभवांच्या. माझ्यावर झालेल्या संस्कारांच्या आणि मला भेटलेल्या, सांभाळून घेतलेल्या माणसांच्या. माझ्यासारख्या 'नायकाचा चेहरा' नसणाऱ्या अभिनेत्याला नाटक, सिनेमा आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांमधून इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या हा म्हटलं तर चमत्कारच म्हणायला हवा. म्हटलं तर? पण का म्हणायचं? कारण केवळ नशिबाच्या हवाल्यावर मला इथवर मजल गाठता आलेली नाही. जे काम केलं ते अतिशय गंभीरपणे, प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं. त्यात कधीही हयगय केली नाही. कोणतंही काम, मग ते छोटं असो की मोठं, नायकाचं असो की खलनायकाचं, विनोदी असो की गंभीर, मी ते माझ्या पूर्ण क्षमतेनंच केलं. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. "आज मी जो काही आहे जिथे आहे ते या सगळ्याचं फळ आहे. या क्षेत्रात वावरणारी काहीतरी करू इच्छिणारी तरुण मंडळी आपापली लढाई तर लढत असणारच पण त्यात माझ्या अनुभवांची भर पडली तर ? या पुस्तकामधून त्यांना थोडी स्फूर्ती मिळाली कामाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्यांच्या नैराश्याच्या काळात किंचित आधार सापडला तरी या पुस्तकानं खूप काही साधलं असं मला वाटेल " #NAME?