Mi Manus Shodhatoy ! | मी माणूस शोधतोय !
Mi Manus Shodhatoy ! | मी माणूस शोधतोय !
वपुंच्या ह्या कथासंग्रहाचे नावच 'मी माणूस शोधतोय' असे आहे आणि ते त्यांच्या लेखनाशी व वृत्तीशीही सुसंगत नाही. वपु जी माणसे शोधतात ती इकडे तिकडे सर्वांनाच दिसणारी असतात पण वपु ज्या नजरेने त्यांच्याकडे बघतात व त्यांना 'टिपतात' ते चकित करणारे असते. आपल्या लक्षात हे कसे आले नाही असे जरी ते वाचल्यावर वाटले तरी आपल्या लक्षात येऊनही आपल्याला ते असे टिपता नसते आले हेही लक्षात येते न् मग ह्या लेखणीद्वारे कौतुक सप्तर्षी, दुर्वास, इत्यादी माणसाचा शोध वाचकांना खुलवून जातो. म्हणूनच ह्या शोधकथांच्या या संग्रहाच्या पंचवीस वर्षात चार आवृत्त्या निघाल्या आहेत.