Mi Pandhari Girangavcha | मी पंढरी गिरणगावचा

Mi Pandhari Girangavcha | मी पंढरी गिरणगावचा
कोकणातला 'विन्हेरे' गावचा सुखवस्तू कुटुंबातील एक मुलगा, त्याकाळचे (१९४८) व्ह.फा. पर्यंतचे शिक्षण घेतो, शाळा मास्तर होतो, त्याचे लग्नही होते पण वाचनाची दांडगी हौस, चित्रकलेची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही . त्यात पत्नी बजावते, 'वडिलांच्या कमाईवर जगू नका, स्वत: कमवा, मी संसार सांभाळेन' आणि मग सुरु होतो एक जीवनसंघर्ष! या जीवनसंघर्षाला नशिबाची साथही मिळते आणि त्याच्या जोरावरच वेगवेगळ्या नोकर्या करुन आपली आवड जपता जपता लेखक प्रबोधनकार ठाकरे यांच्या सहवासात येतो आणि मग एक भटका भन्नाट, यशस्वी वार्ताकार 'लेखक आणि 'कवी' होतो याची ही रसाळ, गतिशील आणि वास्तव कहाणी म्हणजे 'मी पंढरी गिरणगावचा' हे आत्मकथन होय.