Mi Smita Jaykar | मी स्मिता जयकर

Mi Smita Jaykar | मी स्मिता जयकर
स्मिता जयकर म्हटल्यावर त्यांची यशस्वी रंगीबेरंगी कारकीर्द आपल्याला स्तिमित करते. कौटुंबिक सुरक्षित वातावरणातून स्मिता जयकर पहिल्यांदा बाहेर पडल्या पंचतारांकित हॉटेलमधील नोकरी साठी. "त्यानंतर दूरदर्शनचा पडदा तसं पाहिलं तर योगायोगच पण अभिनय आणि परिश्रमाच्या जोरावर हिंदी - मराठी मालिका मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमीवरचा सहज वावर स्मिता जयकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सहजच घेऊन गेला. 'देवदास' आणि 'हम दिल दे चुके सनम' या सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांनी त्यांच्या नावाला ग्लॅमरचं झगझगीत वलय दिलं. " "मिळालेलं यश कीर्ती कशी पचवली त्यांनी ? त्यांच्या या आत्मकथनात 'मी' चा शोध घेण्याचा प्रांजळ प्रवास उलघडतो.त्यांच्या उत्स्फूर्त जगण्याला अध्यात्माचा गहन विषय कसा जोडला गेला अध्यात्माच्या स्वीकारातून त्यांच्यातून झालेला 'मधुरा ' चा जन्म हाही प्रवास तितकाच रंजक. स्वतःचं गृहिणीपण आणि मराठीपण जोपासणाऱ्या स्मिता जयकर या प्रगल्भ नायिकेचं हे आत्मकथन मनोरंजन क्षेत्राबद्दल कुतूहल असणाऱ्या वाचकांना नवा विश्वास देऊन जाईल."