Mi Vanvasi | मी वनवासी

Mi Vanvasi | मी वनवासी
अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसर्या अनाथआश्रमात ठेवणार्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवनपट. लग्नामुळे मधेच सोडावे लागलेले शिक्षण, थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणार्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणार्या सिंधूताईची रोमांचित करणारी जीवनयात्रा. वयाच्या विसाव्या वर्षी नऊ महिन्यांची गरोदर असताना नवर्याने पोटावर लाथ मारून हाकलून दिले होते. ओली बाळांतीण असताना पदरात बाळ घेऊन औरंगाबाद, नांदेड, मनमाड, पूर्णा येथील रेल्वेस्टेशनवर भीक मागितली होती - केवळ एकट्यासाठी भीक न मागता अनेक अनाथांसाठी त्यांनी भीक मागितली, आजही अनाथांसाठी त्या भीक मागत आहेत. नवर्याने सोडून दिल्यावर आईनेही त्यांना घरात घेतले नाही म्हणून आईचा राग न मानता त्या घराबाहेर पडल्या. आज जवळपास एक हजार पन्नास अनाथांची आई म्हणून, पावणेदोनशे जावई, छत्तीस सुनांची सासू म्हणून जगत आहेत.