Mithai | मिठाई

Mithai | मिठाई
कोणताही सण गोड करण्यासाठी गोड पदार्थ हवेतच; पण दर वेळी नवे काय करायचे, असा प्रश्न असतो. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी या पुस्तकात मिठाईचे नानाविध प्रकार सांगितले आहेत.बर्फी, पेढे किंवा खव्याच्या मिठाया फक्त हलवायाच्या दुकानात विकत आणल्या, तरच खायला मिळतात, असे नाही. या पुस्तकात सांगितलेल्या पाककृतीप्रमाणे ते तंतोतंत केले तर तेवढेच चविष्ट बनतात.लाडू, कतली, रोल्स, छेना आणि पनीर मिठाया यासांरख्या पदार्थांच्या पाककृतींचा पुस्तकात समावेश आहे. मधुमेहींसाठी खास शुगर फ्री मिठाईही पुस्तकाच्या साह्याने बनवता येईल. "लवंगलतिका धोडा चंद्रकला पेरूचे चीज परवलाची मिठाई असे वेगळे पदार्थही शिकायला मिळतात. पदार्थ तयार करण्यापूर्वीच्या तयारीचे उपयुक्त सल्ले हे पुस्तकाचे वैशिष्ट्य."