Mitule Ani Rasal | मितुले आणि रसाळ

Mitule Ani Rasal | मितुले आणि रसाळ
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एक कार्यकर्ता म्हणून गेली तीन दशके कार्यरत असताना डॉ. आनंद नाडकर्णींनी स्वत:मधली बहुपदरी संवेदनक्षमता जपण्याचा प्रयत्न केला. त्या प्रवासाचा आलेख म्हणजे विविध विषयांवरचे त्यांचे हे ललित लेख ! ह्या लिखाणामध्ये अनेक अनुभव आहेत. काही स्वत:च्या जगण्याकडे दूरस्थपणे पहाण्याचे काही मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या धडपडीचे साहित्य, इतिहास, तत्वज्ञान अशा विविध विषयांचा स्पर्श असणारे चिंतनपर लिखाण आहे. चित्रपटरसग्रहणापासून कवितेच्या आस्वादापर्यंतच्या दालनांना भेट आहे... रुग्णांबरोबरचे आश्वासक संवाद आहेत आणि सहृदांच्या लक्षात राहिलेल्या आठवणीदेखील आहेत. ‘मितुले’ म्हणजे मोजकेच. इंग्रजीमधला शब्द Precise ! पण त्यामध्ये भावनांचा रसाळपणा हवा. तरच ही जोडी प्रभावी ठरेल असे ज्ञानेश्र्वर लिहितात. प्रस्तुत पुस्तकामधून सामोरे येणारे लेखकाचे बहुआयामी व्यक्तीमत्त्व, जगण्याबद्द्लची आस्था आणि अनुभवांचा व्यापक विस्तार, रसिकांना एक आगळा वाचनानुभव देऊन जाईल.