Mool Shiktana | मूल शिकताना

Mool Shiktana | मूल शिकताना
डॉ. रुडॉल्फ श्टाइनर यांच्या 'द एज्यूकेशन ऑफ द चाइल्ड'या पुस्तकाचा हा सोप्या भाषेत केलेला अनुवाद आहे. त्यांच्या मते मुलांचा कोणत्याही बाह्य प्रभावा शिवाय सहजपणे घडून येणारा शारीरिक मानसिक विकास हा पर्यायांने देशाच्या व जगाच्या कल्याणाकरता महत्त्वाचा आहे. नैसर्गिक रित्या मूल जे काही शिकत असते त्याला बाधा न आणता योग्य वयात मुलांना योग्य तेच शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांनी काय करायला हवं ते त्यांनी सांगितला आहे. खूप सोप्या सोप्या गोष्टीतून आपण मुलांची कल्पनाशक्ती, विचारातील सामर्थ्य वाढवायला मदत कशी करू शकतो, याकरता काय करावं आणि काय टाळावं हे ते सांगतात. मुलांना कल्पनाशक्ती वापरू द्यावी. हाताने काम केल्याने हाताचे बोटाचे स्नायू बळकट होतात तसेच कल्पनाशक्तीच्या वापराने मेंदू तल्लख होतो व मेंदूची चांगली वाढ होते. त्यांचा विचार प्रवाह शिक्षकांना आणि पालकांना ही अत्यंत सकारात्मक आणि व्यापक दृष्टीकोन देऊ शकतो.