Mor | मोर

Mor | मोर
दलित, पीडित समाजाविषयी डॉ. अनिल अवचटांनी आजवर तपशीलवार, आस्थापूर्वक आणि मर्मभेदक असे लेखन केले आहे. ते प्रभावी तर आहेच; पण त्यातून सतत जाणवत राहते ते अवचटांचे संवेदनाशील सामाजिक कार्यकर्त्याचे जागृत, संघर्षोन्मुख मन.'मोर'मधील स्फुट लेखांचे स्वरूप थोडेसे वेगळे आहे. मनाच्या विश्रांत अवस्थेत स्वत:च्या दैनंदिन अनुभवांचे स्मरण-चिंतन करणारे हे ललित लेखन आहे. यातील काही अनुभव व्यक्तिगत स्वरूपाचे, काही कौटुंबिक तर काही सामाजिक जीवनातील आहेत. परंतु या छोट्या लेखांमधूनही अवचटांच्या लेखणीची सारी वैशिष्ट्ये साकार झाली आहेत; एवढेच नव्हे तर हृद्य आणि रम्य जीवनदर्शनाचे स्वरूप त्यांना प्राप्त झाले आहे,