Moravala | मोरावळा

Shivaji Sawant | शिवाजी सावंत
Regular price Rs. 99.00
Sale price Rs. 99.00 Regular price Rs. 110.00
Unit price
Moravala ( मोरावळा ) by Shivaji Sawant ( शिवाजी सावंत )

Moravala | मोरावळा

About The Book
Book Details
Book Reviews

हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ग्रामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको..

ISBN: 978-8-17-766071-5
Author Name: Shivaji Sawant | शिवाजी सावंत
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 92
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products