Mori Nind Nasani Hoy | मोरी नींद नसानी होय

Jayant Pawar | जयंत पवार
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Mori Nind Nasani Hoy ( मोरी नींद नसानी होय ) by Jayant Pawar ( जयंत पवार )

Mori Nind Nasani Hoy | मोरी नींद नसानी होय

About The Book
Book Details
Book Reviews

एकाच महानगरात अनेक विश्वं एकाच वेळी नांदत असतात. समकालातल्या उघड्यावाघड्या बाजारवादी क्रूर वरवंट्यानं या विश्वांमधली अंतरं निर्दयतेनं वाढवत नेलेली आहेत. त्यांच्या मधोमध अधोविश्वाच्यासुद्धा तळाशी लोटले गेलेल्यांच्या जगण्याच्या खटपटीत धुमश्चक्रीनं व्यापलेला इलाखा आहे. तो व्यवस्थेनं फेकून दिलेल्या अवशिष्टासारखा आहे. जगण्याच्या आटापिटीत त्याच्या धांदोट्या झालेल्या आहेत. कथाकार अशा चिरडल्या गेलेल्या जगातल्या चिरफाळलेल्या माणसाचा प्रतिनिधी आणि 'अशा वंचिताचाच वंशज असतो' असं मानणाऱ्या जयंत पवार यांच्या कथा खोल विवरात-'लोअर डेप्थ्स'मध्ये गुदमरत जगण्याची धडपड करणाऱ्यांची जगं मुखर करतात. अधोविश्वाच्या सूक्ष्म तपशिलांसह जयंत पवार यांनी संवेदनशीलतेनं मराठी कथेचा परिघ खचितच प्रशस्त केलेला आहे. बोलीभाषेची विभिन्न रूपं ते आशयाच्या स्तराशी अतिशय वास्तविक जवळीकीनं आणि सहजपणे वापरतात आणि आशयाच्या भौगोलिक नेपथ्याचाही पट विस्तीर्ण करतात. सातत्यानं ते मिथकांची मोडतोड करीत नव्या मिथकांच्या निर्मितीचा प्रयत्न करतात. पवारांच्या कथांमध्ये वास्तव आणि फॅण्टसीच्या हद्दी पुसल्या जाऊन एक निराळंच नेपथ्य उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. काळाच्या जबड्यात असहायपणे गडप होत जाणाऱ्या जगाच्या लिहिलेल्या या बखरीच आहेत आणि आपल्याला त्या जयंत पवारांच्या-त्यांचा स्वतःचा खास ठसा असलेल्या- भाषेत त्यांच्या कथांमध्ये गवसतात. तळातल्या माणसाचं सद्यकालीन व्यवस्थेत चिरडलं जाणं-चिरफाळणं-चिंध्या होणं हा त्यांच्या चिंतेचा निरंतर सवाल आहे आणि हे लेखकाच्या प्रगल्भ आणि सखोल आस्थेशिवाय शक्य नसतं. हा सवाल त्यांच्या कथांमध्ये सातत्यानं मोठा मोठा होत प्रतिध्वनींसह आदळत राहतो. महानगराच्या अदृश्य ठेवल्या गेलेल्या जगातल्या गर्दी-कल्लोळ-कोलाहलाची मिळून कर्कश्श शांततेतली एक निःस्तब्ध किंकाळी हे वाचताना सतत ऐकू येते आणि या कथा वाचून झाल्यावर आपल्याला अंतर्मुख करते. गेली दोन दशकं जयंत पवार यांनी मराठी कथेला मौलिक उंची मिळवून दिलेली आहे. समकालीन मराठी कथेतील ते अनन्य कथाकार आहेत. प्रस्तुत संग्रहातील अप्रतिम स्मरणलेखासह इतर कथासुद्धा ते सिद्धच करतात. #NAME?

ISBN: 978-9-38-290698-8
Author Name: Jayant Pawar | जयंत पवार
Publisher: Lokvangmaya Griha Prakashan | लोकवाङ्मय गृह प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 168
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products