Mothi Tichi Savali | मोठी तिची सावली
Mothi Tichi Savali | मोठी तिची सावली
'मोठी तिची सावली' या पुस्तकाच्या लेखिका मीना खडीकर... मीनाताई आणि दीदी यांच्या मध्ये दोन वर्षाचं अंतर त्यामुळे दीदींच्या लहानपणीचा दंगा खोड्या यांच्या त्या साक्षीदार आहेत परंतु वडील मा. दीनानाथ गेल्यानंतर दीदी ने तिच्या खांद्यावर घेतलेली घराची जबाबदारी आणि सोसलेले कष्ट याचाही त्या साक्षीदार आहेत. त्यामुळे या ग्रंथामध्ये दीदींचा गाण्याचा आलेख मांडण्यावर भर देण्यापेक्षा त्यांची लतादीदींच्या कर्तृत्वाचा कालानुक्रमे आलेख मांडला आहे. मीनाताईंच्या स्मृतीपटलावर रेंगाळणाऱ्या काही अविस्मरणीय आठवणींचा गुंफलेला हा रेशमी गोफ म्हणजेच ...'मोठी तिची सावली'.