Mrugajalicha Masa | मृगजळीचा मासा
Mrugajalicha Masa | मृगजळीचा मासा
सूक्ष्म जाणिवांची तीव्रतर अभिव्यक्ती म्हणजे कविता महाजन यांची कविता. संवेदनशीलता, आनंदोत्सवात बुडून जाणारी अनावर इंद्रियजन्यता आणि नेमकी, सूचक परंतु अनेकार्थी भाषा ही अस्सल काव्याची व्यवच्छदेक लक्षणं. हा काव्यसंग्रह या प्राथमिक अटींची बव्हंशी पूर्तता तर करतोच, शिवाय निव्वळ भावावेगात अडकून न पडता बोधनाच्या, अंतर्ज्ञानाच्या जागाही दाखवतो. विचार हरवत चाललेल्या आणि प्रतिक्रियांवरच आयुष्य घालवणार्या खुरट्या समाजाला या वैचारिक प्रवासाची सक्ती करतो.हा संग्रह प्रौढ, परिपक्व आहेच. त्याबरोबरीनं त्यानं समकालीन मराठी कवितेत आपलं स्थानही अढळ केलं आहे.