Mrutyu ... Mazya Umbarthyashi | मृत्यू ... माझ्या उंबरठ्याशी

Mrutyu ... Mazya Umbarthyashi | मृत्यू ... माझ्या उंबरठ्याशी
कुणी मृत्यू हा शेवट मानतं. कुणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्त्राचा त्याग मानतात. कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते; तर कुणाला अंतिम पूर्णविराम... पण देहाची चेतना संपली की, मनाचीही संपते? आत्मा म्हणजे काय? तो कुठं असतो? जाणिवांचं काय होतं... असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात. मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेष, दु:ख, रडारडी असा हा विषय गहन गंभीर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्यानं प्रकट झाले आहेत. तसंच काही विलक्षण प्रतिभावंतांनी लिहिलेल्या मृत्यूलेखांतून त्या त्या व्यक्तित्वांचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात, हसवतात, डोळे दिपवतात; तर कधी अंतर्मुख करतात. हेच सर्व लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत.