Mughal Sattecha Saripat | मुघल सत्तेचा सारीपाट

Shrinivas Rao Adige | श्रीनिवास राव अडिगे
Regular price Rs. 198.00
Sale price Rs. 198.00 Regular price Rs. 220.00
Unit price
Mughal Sattecha Saripat ( मुघल सत्तेचा सारीपाट ) by Shrinivas Rao Adige ( श्रीनिवास राव अडिगे )

Mughal Sattecha Saripat | मुघल सत्तेचा सारीपाट

About The Book
Book Details
Book Reviews

हिंदुस्थानच्या सिंहासनासाठी मुघल राजपुत्रांमध्ये (शहाजहानची मुले) झालेल्या युद्धाबद्दलचे हे पुस्तक आहे. सतराव्या शतकाच्या मध्यकाळात बिघडलेल्या प्रकृतिस्वास्थ्यामुळे मृत्युशय्येवर पडलेल्या मुघल सम्राट शहाजहानची– दारा, शुजा, औरंगज़ेब आणि मुराद– ही चारही मुले सत्ता हस्तगत करण्यासाठी आपसात झुंजत आहेत. "शहाजहानवर अत्यंत कडक बंदोबस्तात उपचार चाललेले असल्यामुळे अफवांचे पीक भरमसाट वाढते. सम्राट जिवंत आहेत का की त्यांच्या मृत्यूची बातमी हेतुपुरस्सरपणे गुप्त राखली जात आहे? साम्राज्यातल्या गुप्तहेरांनी आणि हस्तकांनी चुकीची माहिती आणि अर्धसत्य गोष्टी प्रसारित केल्यामुळे खरेतर भावा-भावांमधला तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे कशाचीच खात्री देता येत नाही." "अशा कारस्थानाने आणि लुच्चेगिरीने भरलेल्या राजमहालातील वातावरणात– आणि मुराद त्याच्या अतिभोगलालसालुप्ततेसाठी दारा त्याच्या अतिसंवेदनशीलतेसाठी आणि शुजा त्याच्या आततायीपणासाठी कुप्रसिद्ध होत असताना– सम्राट म्हणून सत्तारोहण करण्यासाठी औरंगज़ेबाकरिता अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे असे वाटत आहे. आपल्या प्रत्येक भावाच्या स्वभावातील परिस्थितीतील कमजोर स्थानं ओळखून त्यांच्यावर एकेक करून मात करत त्यांना थंड पण क्रूर डोक्याने आपल्या पायाशी लोळण घेत येण्याची परिस्थिती निर्माण करत औरंगजेब कसे फासे टाकतो; आपल्या हतबल वडिलांनाही तो या ठिकाणी कसे बाजूला करतो व सत्तास्थानाकडे कशी जबरदस्त पावले टाकतो याचे काल्पनिक परंतु वास्तवाशी सहज जुळेल असे वर्णन या कादंबरीत चित्रित केले आहे." "मुघल सत्तेचा सारिपाट ही कादंबरी सत्ताग्रहण श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांचा लेखणीच्या लालित्यपूर्ण फटकाऱ्याद्वारा धांडोळा घेते. दोन आख्खी प्रकरणे युद्धभूमी आणि युद्धाचे वर्णन करण्यात घालवली आहेत." "या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण दगाबाज़ मुघल आणि वासना वारुणी आणि अफूच्या नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे रेखन आहे. तसेच शिकारीच्या नावाखाली निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांनादेखील सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णनदेखील आहे. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे अतिशय चांगले चित्रण या कथानकातून उलगडते."

ISBN: 978-9-35-317018-9
Author Name: Shrinivas Rao Adige | श्रीनिवास राव अडिगे
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Uday Bhide ( उदय भिडे )
Binding: Paperback
Pages: 166
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products