Mukhavate |Yash Series) | मुखवटे |यश सिरीज)

Mukhavate |Yash Series) | मुखवटे |यश सिरीज)
मुखवटे, मामाच्या गावाला, पाहुणी, कंटाळा, मोठी शाळा, हात मोडला अश्या सहा रंगीत पुस्तकांचा संचामध्ये लेखिका माधुरी पुरंदरे यांनी मुलांचं भावविश्व नेमकेपणाने टिपलेले आहे. पालकांनी मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवावीत आणि स्वतःही त्यात रममाण व्हावं. या पुस्तकांची भाषाशैली तसंच चित्रशैलीही सहज व सोपी आहे. माधुरीताईंची चित्रंही पुन्हा पुन्हा पाहावी अशी असतात. चित्रं पाहताना मुलांशी वेगळा संवाद होऊ शकतो. त्यातून मुलांची शब्दसंपत्ती वाढू शकते. यशच्या संचात लहान मुलांच्या मनात काय चालतं याचा विचार प्रामुख्याने केला आहे. म्हणूनच या गोष्टी लहान मुलांना आपल्याशा वाटतात. लहान मुलाच्या जीवनात घडणारे व पुन्हा पुन्हा अनुभवावे असे अनेक प्रसंग यशच्या या सहा पुस्तकांत येतात.