Mukhawata | मुखवटा

Mukhawata | मुखवटा
रक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा. तिला कादंबरीची नायिका तरी कसे म्हणायचे! आहे खरी कथाभागाच्या केंद्रस्थानी. उसन्या नातेवाईकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. गुंतागुंतीच्या कादंबरीत तसे अनेक नायक व नायिका सापडतील. मग या वृद्धेलाच नायिका का करू नये? तिनेच आपल्या कर्तृत्वाने व निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपून त्यांना नवी वळणे दिली आहेत. अखेर प्रत्येक घरातील वैशिष्ट्यपूर्ण कुलसंस्कृती, आचार-विचार व स्वयंपाक-संस्कृती देखील डोळ्यात तेल घालून जतन करतात व त्यात भर घालतात त्या परक्या घरातूनआलेल्या स्त्रियाच ना! या कादंबरी मध्ये प्रामुख्याने अरुण साधू यांनी स्त्री ही कल्पना मध्यवर्ती ठेवून या कादंबरीचे लेखन केले आहे.