Mumbai Gangwar | मुंबई गँगवॉर

Mumbai Gangwar | मुंबई गँगवॉर
ही कथा आहे मुंबईची… मुंबईने पाहिलेल्या एका काव्याची. राक्षसी महत्त्वाकांक्षेची, मुंबईवर राज्य केलेल्या भाईलोकांची, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची… त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची, खूनबाजीची आणि हे थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांचा लगाम हाती धरणाऱ्या राजकारण्यांची. ही गोष्ट आहे सोन्या-चांदीच्या स्मगलिंगची, पाकीटमार- ब्लॅकरवाल्यांची, मटका जुगारवाल्यांची, वेश्याव्यवसाय करणाऱ्या पोरींची, दलालांची, धारावीतल्या चुलीवर रटारटा उकळणाऱ्या हातभट्टीची आणि चामड्याच्या गोदामात लपवलेल्या चरस-गांजाची. "वरवर फिक्शन वाटणारी पण नकळतपणे तुम्हाला वास्तवाच्या समोर उभी करणारी कादंबरी मुंबई गँगवॉर."