Musalmani Amdanitil Marathe Sardar | मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार

Musalmani Amdanitil Marathe Sardar | मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार
सन १९०९ सालाच्या काळात श्री. दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी 'मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार' हे एक छोटेखानी माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. पण जरी ते छोटेखानीच असले तरी; 'तो' एक शोधनिबंधवजा ऐतिहासिक संदर्भग्रंथच म्हणायला हवा. मुळात अशा विषयात एखादाजरी कागद माहिती देणारा मिळाला तरीही त्याला 'संदर्भपत्र' असे महत्त्व 'प्राप्त' होते. ह्या पुस्तकाला तर ऐतिहासिक माहितीपूर्ण अशी ६४ पाने! आहेत. हे पुस्तक आजच्या ऐतिहासिक विषयाच्या अभ्यासकांना, संशोधकांना 'बेकनब्रेड'च ठरणार आहे.इतकी सूक्ष्मसंशोधित माहिती तीही तळटीपांसहित दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी या ग्रंथात उपलब्ध करून दिली आहे.