My Life In Full | माय लाईफ इन फुल

My Life In Full | माय लाईफ इन फुल
स्वभावातील स्पष्टवक्तेपणा आणि त्याला लाभलेली विनोदाची किनार याचा वापर करून इंद्रा नूयी यांनी फान छान पुस्तक लिहिले आहे. भारतातील त्यांच्या लहानपणापासून ते कार्पोरेट विश्वात यशस्वी होण्यासाठी निश्चयाने केलेले प्रयत्न आणि प्रसंगी संतुलन साधण्यासाठी केलेले मोठे बदल, निग्रहाने उचललेली पावलं... सर्वच कौतुकास्पद. नोकरी करणार्या सर्व महिलांनी आणि महिलांबरोबर काम करणार्या महिलांवर प्रेम करणार्या आणि त्यांना पाठिंबा देणार्या सर्व पुरुषांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. - हिलरी रॉडहॅम क्लिंटन ही एका निडर महिलेने सांगितलेली तिची चित्ताकर्षक आत्मकथा आहे. तिने लिंगभेदाचे सर्व अडथळे पार केले आणि 21 व्या शतकातील ‘बिझनेस लीडर’ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली. इंद्रा नूयीच्या नेतृत्व गुणांचा वारसा हा त्यांना मार्गदर्शक ठरलेल्या ‘हेतुपूर्वक कामगिरी’मध्ये दिसून येतो. त्यांनी आत्मसात केलेले हे तत्त्वज्ञान काळाच्या पुढचे होते. - किरण मझुमदार शॉ, एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन, बायोकॉन लिमिटेड ‘माय लाईफ इन फुल’ हा एका असामान्य महिलेचा भारतातील तिच्य तारुण्यापासून ते जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीत शिखरावर पोचण्यापर्यंत चित्ताकर्षक वृत्तांत आहे. प्रेरणा देणारे आणि वाचायलाच हवे असे पुस्तक. - नंदन निलेकणी, चेअरमन को-फाऊंडर ऑफ इन्फोसिस, चेअरमन आधार.