Naadlahari | नादलहरी

Naadlahari | नादलहरी
‘कर्तव्यवेदीवर’ ही कथा शरद-शरयू यांच्या असफल प्रेमाची कहाणी आहे. घरच्या विरोधामुळे त्यांचं लग्न होऊ शकत नाही; शरयूचं लग्न होतं दुसर्या तरुणाशी. कोणतं वळण घेते मग ही असफल प्रेमाची कहाणी? ‘लाकडी साप’- घरातला एक लहान मुलगा जत्रेतून लाकडी साप विकत आणतो आणि आपल्या धाकट्या भावाला घाबरवण्यासाठी तो लाकडी साप एकदम त्याच्या समोर नेतो. लहान भाऊ घाबरतो आणि त्याला ताप भरतो. तो ताप उतरतच नसतो. मग? ‘दोन ध्रुव’ या कथेचा कथानायक सामान्य परिस्थितीतला. आई-वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन तो श्रीमंत मुलीशी, मनोरमाशी लग्न करतो. गरीब-श्रीमंत हे दोन ध्रुव मग एक होतात का? ‘पुरुषी प्रेम’ या कथेतील कथानायक एका तरुणीशी प्रतारणा करतो आणि दुसर्या मुलीशी लग्न करतो. ज्या तरुणीशी प्रतारणा केलेली असते, ती तरुणी त्याला आणि त्याच्या बायकोला भेटते. आणि? या कथांबरोबरच अन्य कथाही या कथासंग्रहात आहेत. करुणरसपूर्ण तरीही चिंतनशील कथांचा संग्रह.